अंकुश जागले
तालुका प्रतिनिधी, शहापुर
शहापूर:-तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे शिवशेतपाडा हे स्वतंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील रस्ता-विज यांसारख्या मुलभुत सुविधांपासून आदिवासी वस्ती वंचित होती.विशेष म्हणजे हि वस्ती मध्ये रेल्वे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असून देखील मुलभूत सुविधांपासून वंचित आहे,हिच बाब श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका सह-सहसचिव योगेश शेणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या अडचणी-समस्या जाणून घेतल्या.प्रत्यक्ष चर्चा केल्या नंतर योगेश शेणे यांना जाणवले की सदर वस्तीला तात्काळ रस्ता आणि वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यांनी तात्काळ ग्रामस्थां आश्वासित केले की, माझ्या श्रमजीवी संघटने मार्फत शासनाला पाठपुरावा करून तुम्हाला रस्ता व लाईट ची सोय करून दिली जाईल. त्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू केला. आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. या कामी त्यांना शहापूर महावितरण उप अभियंता प्रकाश मालखेडे,खर्डीचे सुरेश राठोड यांनी सहकार्य केले. शिवशेत पाडा येथे १५ घरे असून ७० च्या आसपास लोकवस्ती आहे. आपल्या पाड्यावर विजेची सोय झाली.लवकरच रस्ता देखील येईल याचा आनंद व्यक्त करत गावकऱ्यांनी योगेश शेणे, व श्रमजीवी संघटना शहापूर यांचे आभार मानले.


