मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा चांदूर रेल्वे तहसिलअंतर्गत येणाऱ्या थूगांव इसापूर येथे संविधान सन्मान दिनाचे औचित्य साधून धामणगांव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष व तडफदार विधायक प्रताप अडसड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करुन रिबीन कापून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा जयघोषानी आसमंत दणाणून गेला होता.. थुगांव गावातील पूर्ण वातावरण आनंदमय तसेच हर्षोल्हासाने भरुन गेले होते. तसेच सर्व युवावर्गाच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते. यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, “समाजात एकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, तुमची एकता पाहून मी धन्य झालो. इतक्या मोठ्या व्यक्तीमत्व असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा माझ्या हातांनी झाला ही माझ्यासाठी अत्यंत सौभाग्याची व आनंदाची बाब आहे तसचे मी या गावाच्या विकासाकरीता सदैव तत्पर राहीन. यावेळी अनावरण कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती. गावातील हजारो नागरिकांनी यावेळी या भोजनदान कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच निलम ग्रुप चे चेअरमन सदीप गिरासे यांचे समवेत सरपंच अनिल राठोड, चांदुर रेल्वे पं.स. चे उपसभापती प्रतिभाताई डांगे, उपसरपंच रविंद्र मोखळे, मारोती गिरासे, पाथरगांव ग्रा.पं. सदस्य संगीता मोखळे, मोतीसिंग जाधव, सुरेश मोखळे, दुर्गादास मोखळे, राहेन मोखळे, उमेश गोरले, कमलेश मोखळे, अंशुल मोखळे, अमोल भरडे, अमित बरडे, निता मोखळे, सारीका गोले, प्रिया मोखळे शन्तु मोखळे, वनिता मेश्राम, मीना मोखळे, निर्मला मोखळे सहीत थुगाव नागसेन मंडल चे धर्मेश मोखळे, जगदीश श्रीरामे, दिनेश मोखळे, अतुल मोखळे, प्रदीप मोखळे, राज मोखळे, समीर मोखळे, संकेत मेश्राम, गंगाधर मोखळे, प्रशिक मोखळे, सतीश मोखळे, ऋऋत्विक सरदार, प्रदीप मेश्राम, दीपकम श्रीरामे, विशाल मोखळे, अशोक मोखळे, धीराज मोखळे, रोशन गोले, सुनिल मोखळे, राजेश खवसे, सुदाम मोखळे यांनी हा कार्यक्रम सफल करण्याकरीता अखंड परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गादास मोखळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण मोखळे यांनी केले.