भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर – मागिल एप्रिल महिन्यात झालेल्या गारपीट मध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले होते या नुकसान भरपाई पोटी शासनाने शेतकऱ्यांचा बॅंक खात्यात अनुदान जमा केले परंतु ज्या शेतकऱ्यांचे व्ही के नंबर येऊन देखील काही कारणांमुळे अद्याप खात्यात अनुदान रक्कम जमा झाली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी दि.६डिसेंबर रोजी तहसील कार्यालय येथे विशेष दुरुस्ती कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तरी अशा शेतकरी बांधवांनी आपल्या त्रुटी दुरुस्ती करून घ्यावे असे आवाहन माहुर चे काळजी वाहु तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)