शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : कलीयुगात नामस्मरण हा मोक्षप्राप्ती चा सर्वोत्तम मार्ग असून मर्यादा पुरूषोत्तम प्रभु रामचंद्रांचे नामस्मरण व गोसेवेच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनात यशसिद्धी प्राप्त होते त्यामुळे प्रत्येकाने या जीवनमार्गाचा अवलंब करावा असेआशिर्वचन आंतरराष्ट्रीय राम स्नेही संप्रदायाचे जगदगुरु आचार्य श्री स्वामीजी श्री श्री १००८ रामदयालजी महाराज यांनी दिले.गुरूवार ता. ३० नोव्हेंबर व २३ रोजी येथील श्री संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळेत गोभक्तांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी महाराजांच्या शुभहस्ते पवित्र मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने गोपुजन करण्यात आले. जगदगुरुंनी गोशाळा व मठाची आस्थेवाईकपणे विचारपुस करून अडी-अडचणी जानुन घेतल्या. तसेच गोशाळेच्या वतीने राबवल्या जाणारया समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून गोशाळेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मठाचे कार्याध्यक्ष श्री जगन्नाथ पवार, शैलेंद्र तोष्णीवाल, अविनाश बिहाणी, हनुमान मंत्री, चेतन लोया, राजेंद्र करवा यांनी महाराजांचे स्वागत केले. कार्यक्रमा साठी श्री किशनजी सारडा, रामनिवास मंत्री, सुनील सोमाणी, शिवनारायण मालाणी, रामप्रसाद साबू, आनंद सोनी, शंतनू खरात, रमेश राठोड, अजित कुलकर्णी,रामसुख मंत्री, रीतेश मंत्री, राजेश मंत्री, संजय मणियार आदींची उपस्थिती होती.


