अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
दि.2 डिसेंबर केज तालुक्यातील मौजे राजेगांव ता.केज .जि. बीड येथील जिल्हा प्राथमिक शाळा येथे बी .एल .ओ मोराळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी चालु झाली आहे.दि.25 /11/2023 रोजी शनिवार पासुन जि.प.प्रा.शाळा येथे अर्ज स्वीकृती चालु आहे.तरी दि.01_जानेवारी 2023 रोजी वयाची 18 वर्ष पुर्ण करणार्या सर्वांना दि. 09 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येतील जेणे करून लोकसभा निवडणुक 2024 पुर्वी त्यांना ओळखपञ मिळेल.या विशेष कार्यक्रमामध्ये 1) नवीन नांव लावणे 2) नांव वगळणे 3)नांवात दुरूस्ती करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्या साठी लागगणारे आवश्यक कागदपञे 1)पासपोर्ट फोटो 2 ) जन्मतारखेचा पुरावा 3) आई/वडिलांचे मतदान कार्ड झेरॉक्स 4) आधार कार्ड 5) बॅंक पासबुक झेरॉक्स किंवा वीज बिलाचे झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जि .प.प्रा. शाळा बी .एल. ओ /मुख्याध्यापीका मोराळे मॅडम यांच्या कडे अर्ज सादर करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.सह शिक्षीका काळे मॅडम व पोषण आहार मदतनीस म्हणुन जाधव मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभत आहे.