अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि .2 डिसेंबर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी
जालना येथील श्री.दिपकराव रणनवरे यांच्या आमरण उपोषणास केज सकल ब्राम्हण समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,समस्त ब्राम्हण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवान श्री .परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी श्री.दिपकराव रणनवरे हे दिनांक २८ नोव्हेंबर पासुन गांधी चौक चमन जालना येथे आमरण उपोषण करत आहेत सदरच्या उपोषणास समस्त ब्राम्हण समाज केज ता.केज.जि.बीड. आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत.आम्ही आपल्या सोबत आहोत.सदरच्या आंदोलनाची शासन दरबारी आपल्या मागणी ची दखल नक्कीच घेतली जाईल.हिच अपेक्षा आहे. यासाठी समस्त ब्राम्हण समाज केज दिनांक ०१ डिसेंबर २०२३ रोजी शुक्रवार या दिवशी तहसिल कार्यालय केज येथे जाहीर पाठींबा देत आहोत.तरी सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन ब्राम्हण समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा ब्राम्हण समाज केजमध्ये कधीही, कोठेही,कसेही,काहीही आंदोलन करेल याची नोंद शासनाने घ्यावी असा ईशारा समस्त ब्राम्हण समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.