अजिंक्य मेडशिकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी मंडळात मागील काही दिवसांपासून मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले.सततच्या पावसाने शेतातील उभे पिके कोलंडून गेली. काढणीला आलेल्या तूर पिके जमीनदोस्त होऊन त्या मध्ये उभ्या पिकात शेंगा मध्ये दाने फुटून त्याला कोंब आले. पावसाळयात ऐनवेळी सोयाबीनचे पिक परिपक्व होण्याच्या अवस्थेत पावसाने दांडी मारल्यामुळे सोयाबीनचे पीक हे अपरिपक्व अवस्थेत होरपळून निघाले होते. त्यामूळे सोयाबीनच्या उत्पन्नावर त्याचा लक्षणीय घट आली.तुरीचे पीक या वेळी बिना पाण्याची कोरडवाहू असो किंवा ओलिताच्या तुर असो सर्वच्या सर्व ह्या चांगल्या व परिपक्व अवस्थेत आल्या होत्या.तूर पिकाला भाव पण चांगला होता.मात्र शेतकऱ्याची मागची साडे साति काही वेगळ्याच मनःस्थितीत होती.सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे उभे तूर पिके आडवी होऊन त्याचे आतोनात नुकसान झाले. यांच वृत मेडशी मधील प्रसार माध्यमांत झळकाताच प्रशासनाला जाग आली. व मेडशी मंडळ मधील तूर पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना जिल्हाधकारी वाशिम यांनी दिल्या. आज मेडशी महसूल मंडळ मधील मंडळ अधिकारी एन एम इंगळे कृषि सहायक डी के रणवीर तसेच तलाठी दत्तराव घुगे व के एल अवचार यांच्या सह कोतवाल घनश्याम साठे व दिलीप ताजने यांच्या उपस्थीती मध्ये युद्ध पातळी वर शेताच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्यास सुरवात झाली. या वेळी उपस्थित मेडशीचे सरपंच शेख जमीर,ह्यांच्या सह संजय भागवत,संदिप घुगे, राजदार पठाण , शेख अक्रम ,सचिन मुंढे, प्रशांत मेडशीकर, सोयाल पठाण व अजिंक्य मेडशीकर उपस्थित होते.