कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद:मॉडर्न इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज बोरद या शाळेत नवीन मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता मॉडर्न इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज येथून मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ. कॉलेजचे प्राध्यापक अशोक राठोड व शाळेचे मुख्याध्यापक निलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यावेळी वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून मतदार नोंदणीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी अशोक
राठोड यांनी लोकशाही संघप्रणालीमध्ये मतदाराचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.तसेच निलेश सुर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सांगितले की,तुम्ही मतदार झालात तर तुमच्या एका मता मध्ये उमेदवाराला जिकविण्याची ताकत निर्माण होते.त्यामुळे तुमचं मत देशासाठी अमूल्य आहे.त्यासाठी १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी न चुकता आपले नाव मतदार यादीत नोंदवावे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.शाळा बोरद येथील बी.एल.ओ. सतीश पाटील व ज्योतिराम ढोणे यांच्यासह पर्यवेक्षक भटू पवार हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला प्राध्यापक सुभाष पाडवी यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तथा ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व पालक यांनी आपली उपस्थिती दर्शविली.