प्रकाश नाईक तालुका
प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- दि.2 डिसेंबर 2023 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने आणि सा.बा.विभाग अंतर्गत विविध रस्ते बांधकामाचे भूमिपूजन व सभा मा.अॅड.के.सी.पाडवी माजी. मंत्री आदिवासी विकास तथा आमदार अक्कलकुवा,अक्राणी विधानसभा मतदारसंघ यांचा हस्ते झाले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत –
1.प्र.रा.मा.- 01 ते बर्डी,वेहगी ते हुनाखाब इजिमा – 06 रस्ता
5054-04 बजेट अंतर्गत
1- तोलवापाड, पिपळखुटा काकडतीपाडा,रस्ता करणे ग्रा.मा 79
2.प्र.रा.मा 01 ते पिपळखुटा,उकलपाडा रस्ता करणे व जलनिस्सारणाचे काम करणे.
3.प्र.रा.मा 01 ते पिपळखुटा,उकलपाडा रस्ता करणे ग्रा.मा.108
4.हुणाखांब ते मोकसमाळ रस्ताचे बांधकाम करणे
5.हुणाखाब मद्रापाडा विनीपादर रस्ता करणेव जलनिस्सारणाचे काम करणे.
ह्या रस्त्याचे भूमिपूजन केले आणि पिपळखुटा येथे सभा घेण्यात आली होती. सभेला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबत अॅड.गोवाल के.पाडवी,असली
सिताराम राऊत,सी.के.पाडवी, सभापती नानासिग वसावे,उपसभापती मेलदीबाई अमत,अमत वळवी,वाण्या वळवी,माजी सभापती बिज्या वसावे,माजी उप सभापती पिरेसिंग पाडवी,
पोहल्या नुरजी वसावे चिमलखेडी व नर्मदा परिसरातील पदाधिकारी व सहकारी,माजी सभापती या भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित होते.








