संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- श्री समर्थ वाचनालय घाटंजी येथे दोन दिवसीय दिवाळी अंकाचे २०२३ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनीचे उद्घाटन समर्थ विद्यालयाचे प्राचार्य देवदत्त जकाते यांचे शुभहस्ते झाले. श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म. मो. चोपडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थितीत श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव न. रा. वैद्य होते.
या प्रदर्शनीत ६० दिवाळी अंक ठेवण्यात आले. त्यात आरोग्य, भविष्य,योग,कृषीविषयक, विनोदी अंक, स्त्री विषयक दिवाळी अंक तसेच बाल वाचकांसाठी बालविषयक आणि विज्ञान विषयांवरील दिवाळी अंक होते. या प्रदर्शनीचा सर्व वाचक सभासदांनी लाभ घेतला. त्यानंतर हे अंक वाचकांना वाचनासाठी उपलब्ध झाले.
यावेळी श्री समर्थ वाचनालयाचे वाचक सभासद व कर्मचारी उपस्थित होते. वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनी करिता सहकार्य केले.








