संजय गवळी
ग्रामीण प्रतीनीधी, अकोट
अकोट : ग्राम पणज येथुन जवळच असलेल्या ग्राम बोचरा येथील हनुमान मंदीरात सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे व कृषी विभाग, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुक्यातील मौजे बोचरा येथील श्री.हनुमान मंदिर सभागृह येथे एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे फळशास्त्र विभागाचे सहायोगी प्राध्यापक डॉ.उज्ज्वल राऊत, किटकशास्त्रज्ञ डॉ.प्रशांत नेमाडे व नव्या अग्री ट्रेडिंग कंपनी पुणे चे डॉ.अझहर पठाण, विभागीय व्यवस्थापक पणन महामंडळ अमरावती विभाग श्री.दिनेश डागा, यांचे सह तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी,अकोट श्री.सुशांत शिंदे, प्रशिक्षण अधिकारी, एमसिडीसी पुणे चे श्री.हेमंत जगताप, मॅग्नेट प्रकल्पाचे श्री.निलेश वानखेडे, प्रगतिशील शेतकरी श्री.पंजाबराव बोचे जय हनुमान टिशू चे,प्रा.दिनकर जायले इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ.उज्ज्वल राऊत यांनी मार्गदर्शन करत केळी पिकाचे लागवड तंत्रज्ञान विषयावर बोलत असताना केळी या पिकांच्या विविध जाती,त्याकरिता आवश्यक असलेले हवामान, जमिनीची आवश्यकता, खत व सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्व इत्यादींबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.प्रशांत नेमाडे यांनी केळी पिकांवरील विविध प्रकारची कीड व रोगांची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत निर्यातक्षम केळी उत्पादन वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. अझहर पठाण यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनसाठी घ्यावयाची काळजी, केळी निर्यातीच्या वाव,संधी आणि त्याचे विविध प्रकारची मानके याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.श्री. दिनेश डागा यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी माहिती देत प्रकल्पांतर्गत घटकांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक प्रशिक्षण अधिकारी श्री.हेमंत जगताप यांनी केले तर संचालन कृषी पर्यवेक्षक श्री.अनंत देशमुख यांनी केले. प्रशिक्षणाचे शेवटी उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी श्री.सुशांत शिंदे यांनी करत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. प्रशिक्षणासाठी परिसरातील बहुसंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली होती