सचिन डोळे: ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून राबवली जाणारी जलजीवन मिशन योजना कुंभारगाव मध्ये मंजूर झाली.सदर योजनेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून एक कोटी 27 लाख रुपये चा निधी मंजूर करण्यात आला.सदर निधी अंतर्गत पुढील वीस ते पंचवीस वर्षाच्या नियोजनाच्या अनुषंगाने सदर निधी मंजूर झालेला आहे.कुंभारगाव माहिती अधिकार युवा कार्यकर्ते श्री अरविंद वाघमारे यांनी सदर तक्रारी अर्जामध्ये पिण्याच्या पाण्याची गळती टाकी मैला मिश्रित आरोग्यास अपायकारक विहीर दर्जाहीन पाईपलाईन व अगणित पाईप लिकेज असे अनेक इतर मुद्दे अधोरेखित केलेले आहेत. शासनाकडून आलेल्या निधीचा पूर्णपणे अपव्य झालेला असून जलजीवन पाईपलाईन योजनेचा बोजवारा उडालेला आहे.सदर योजनेबाबत संबंधित कंत्राटदार व पंचायत समिती कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली असता. टोलवाटोलवीची उत्तरे दिलेली आहेत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुंभारगाव मंजूर प्राप्त निधी त्वरित पुनश्चिक शासन तिजोरीत पुन्हा जमा करण्यात यावा.व सदर कंत्राटदार व संबंधित पाणीपुरवठा कर्मचारी यांची वरिष्ठ चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी.अशी मागणी श्री अरविंद वाघमारे यांनी केलेली.आहे सदर तक्रारीची नोंद तातडीने शासनाने घ्यावी अन्यथा दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद कार्यालय पुणे येथे श्री वाघमारे यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे.








