अनिल वेटे. ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
यवतमाळ:- येथील प्रख्यात साहित्यीक व सामाजीक विचारवंत मा.बाबारावजी मडावी यांना क्रांतीगुरु सेवाभावी संस्था गुंधा ता.लोणार जि.बुलढाणा कडुन वस्ताद लहुजी साळवे जयंत्ति प्रित्यर्थ राज्यस्थरीय ,,साहित्य गौरव,, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार प्रदान सोहळा आ.बच्चुृ कडु यांचे हस्ते संपन्न झाला.संस्थेचे सचिव मा.शंकर मानवतकर यांची प्रमुख ऊपस्थिती असून त्यांनी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले.या सोहळ्यात निरनिराळ्या क्षेञात कार्य करणा-यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.साहित्यीक बाबाराव मडावी यांच्या साहित्याचे राष्ट्रीय भाषा हिंदीत भाषांतर होवुन राष्ट्रीय स्थरावर दखल घेण्यात आली.त्यांचे साहित्यावर अनेक अभ्यासकांनी पी.एच.डी व एम फील केले असुन सद्या पाचसहा अभ्यासकांनी पी.एच.डी अभ्यासात समावेश केला आहे.त्यांचे साहित्य पाच विद्यापिठात अभ्यासात समाविष्ठ झाले आहे.मडावी हे सामाजीक कार्यकर्ते म्हणुन प्रसिध्द असुन ऊत्कृष्ठ वक्ते आहेत.विविध समाजघटकाशी त्यांची नाळ जुळलेली आहे.त्यांना आजपावेतो विविध घटकाकडुन पन्नासचेवर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.