अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
दि.१डिसेंबर २०२३ रोजी केज तालुक्यातील लोक उत्सव समितीची बैठक राममंदीर येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांची लोकोत्सव समितीप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.तर सहप्रमुख म्हणून भागवत भुषण
ह.भ.प.केशव महाराज शास्त्री,श्रीकृष्ण आश्रम केज यांची निवडकरण्यात आली.अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर साकार होत आहे.या मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. या निमित्ताने आनंदउत्सव व छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक लोकोत्सव सोहळा अभियान संपुर्ण केज तालुक्यामध्ये घरा घरापर्यंत पोहोंचवणार असल्याची माहिती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष ह.भ.प.भगवान महाराज शास्ञी वरपगाव कर यांनी दिली.दिनांक ०१ डिसेंबर रोजीशुक्रवारी केज शहरातील श्रीराम मंदिरात ३५० वा शिवराज्याभिषेक लोकोत्सव व श्रीराम मंदिर लोकार्पण व मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा समितीची बैठक समितीचे अध्यक्ष ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री व ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षेखाली उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी शशिकांत गव्हाणे यांनी प्रभू श्रीराम मंदिर आनंद उत्सव समितीच्या वतीने केज तालुक्यात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली तसेच यांनी ३५० वा शिवराज्याभिषेकाचे इतिहासकालीन महत्व विशद करून आगामी काळातील कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या समारोपात ह.भ.प.भगवान महाराज शास्ञी यांनी केज तालुक्यात रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण आनंदोत्सव अभियान व ३५० वा शिवराज्याभषेक दिन लोकोत्सव अभियान घराघरांमध्ये पोहोंचवणार असल्याचे सांगत प्रत्येक घरामध्ये व मंदिरामध्ये दीपोत्सव करून व गुढ्या उभारून तसेच विविध माध्यमातून आनंद साजरा करणार असल्याचे सांगून आनंद उत्सव समितीची घोषणा केली.आगामी काळात या समितीच्या विविध बैठका होणार असून मंदिर लोकार्पण व शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत कार्यक्रमांची रूपरेषा ठरणार आहे.केज तालुक्यामधून प्रत्येक व्यक्ती या उत्सवामध्ये सहभागी व्हावा याकरिता समिती कार्यरत असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीस रामभक्त व शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


