शुभम गावंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरगाव मंजू
बोरगाव. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कुरणखेड नदी पत्रामध्ये सहा वर्षे वयाच्या मुला सह आईने आपली उडी घेऊन आत्महत्या केली .या घटनेने गावात हळहळ वेक्त केली जात आहे आत्महत्या पूर्वी या महिलेने चीट्टी लिहून ठेवली असल्याचे आढळून आले या महिलेचे लग्ना नंतर काही पती पतनी विभक्त होते तरी सुद्धा या महिलेचा विभक्त पती महिलेला विनाकारण त्रास देत होता .विभक्त पतीच्या त्रासाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले सदर घटनेची माहिती मिळताच बोरागावमंजू पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदना साठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून सदर घटनेची माहिती महिलेच्या नातेवाईकांना कळविण्यात आली सदर महिला ही वर्धा येथील असल्याचे निदर्शनास आले.सदर घटनेची कारवाही करण्यात कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन पथकाने मोलाचे सहकार्य लाभले.