प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१.डिसेंबर काल दि.३० नोव्हेंबर रोजी बीड येथे परशुराम संस्कार सेवा संघाच्या विविध पदावर पाथरी येथील ब्राह्मण समाज बांधवांच्या पदर नियुक्त झाल्या काल बीड येथे परशुराम संस्कार सेवा संघाची महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची वार्षिक बैठक होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञाताई रामदासी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून निलेश राव कुलकर्णी जळगाव हे होते अखिल भारतीय पेशवा संघटनेचे सचिन वाडी पाटील हे पण होते तसेच या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश काका वाघमारे . संपादक दिलीपराव खिस्ती(लोकप्रश्न) संपादक प्रशांतराव सुधाखे, हे होते यावेळी पाथरीचे अशोक केशवरावजोशी यांची परभणी जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली तर वैभव विलासराव मुळे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली विष्णू रमेशराव पाथरीकर यांची पाथरी शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली व नितीन बापूसाहेब पाटील (पाटोदकर) यांची मराठवाडा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली व प्रकाश केदारे यांची महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व नियुक्ती झालेल्या बांधवांना शाल पुष्पहार व नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रकाश केदारेयांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजीनगर इथून आलेले सचिन वाडी पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्र मास विठू गुरु वझुरकर ,लक्ष्मीकांत पांडे, बाबा पाठक, लक्ष्मीकांत दडके, रमाकांतराव कुलकर्णी, गोपाळराव राजे ,अनिल राव कुलकर्णी, विनायकराव देशमुख, मंगलाताई अगवान ,सुषमाताई थीगळे,अर्चनाताई जोशी ,निलेश पाठक ,नितीन भालेराव, सुरेश देशमुख ,प्रसाद कुलकर्णी, प्रकाशराव जोशी, अमृता ताई जोशी, सर्व महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष तालुका पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजाननराव जोशी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथायोग्य स्वागत केले व आपल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठीशुभेच्छा दिल्या यावेळी बाळासाहेब थीगळे यांनी बैठकीस आलेल्या सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी बाळासाहेब थीगळे यांनी पण सर्वांचे आभार मानले व सर्वांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या अगदी खेळीमेळीच्या वातावरणात महाराष्ट्र पदाधिकारी बैठक खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली. यावेळी जालना येथे गांधी चमन या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या मागण्यासंदर्भात दीपक करणारे हे उपोषण करत आहेत या उपोषणास परशुराम संस्कार सेवा संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी, सचिन वाडी पाटील, विठू गुरु वझुरकर, मकरंद जोशी, गोपाळराव राजे, विशाल वझरकर यांनी जालना येथे जाऊन सदरील उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.








