शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ सेलू,डॉक्टर असोसिएशन सेलू, व सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने
सेलू :सेलू शहरातील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ सेलू,डॉक्टर असोसिएशन सेलू, व सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व पत्रकार व दिव्यांग व्यक्तींचे आरोग्य तपासणी शिबीर दि. 03 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 10:30 वाजता हुतात्मा स्मारक सेलू आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी अध्यक्ष परभणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मा.अशोक नाना काकडे,तर प्रमुख उपस्थिती सेलू तालुक्याचे तहसीलदार मा.दिनेश झांपले,पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.समाधान चवरे, सेलू परभणी जिल्हा उपाध्यक्ष मा.महमद इलीयास आदीजण उपस्थित राहणार असून या आरोग्य तपासणी साठी तालुक्यातील सर्व पत्रकार आणि दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून आपल्या आरोग्यांची तपासणी करून घ्यावी.असे आवाहन डॉक्टर असोसिेशनचे अध्यक्ष डॉ. ऋतूराज साडेगावकर, सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन,डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष किशोर कटारे, दिव्यांग संघटनाचे अध्यक्ष किशोर साळवे,उपाध्यक्ष पठाण अबरार, सचिव शेख अबरार, सहसचिव जावेद खानअबरार, सल्लागार पप्पू चव्हाण,पत्रकार संघाचे सल्लागार कांचन कोरडे,नारायण पाटील,श्रीपाद कुलकर्णी,डी. व्ही. मुळे, निसार,अबरार,संजय मुंढे, शिवाजी शिंदे, रोडगे श्रीपाद,शिवाजी आकात,बहिरट रामेश्वर,नीलकंठ पवार, दिलीप मोरे, संतोष गरुड, पूनमचंद खोना,महादेव गिरी,राहुल खपले,निशिकांत रोडगे,नीरज लोया,नितीन कुंभकर्ण, रोहित झोल व सर्व पत्रकार सदस्य आदिनी केले आहे.








