मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण: तालुक्यातील म्हारोळा येथील प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम. सामाजिक कार्यकर्ते व संस्था अध्यक्ष मधुकर बर्फे यांच्या वतीने दिवाळी निमित्त थोडेसे गरीबांसाठी पण. एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत चितेगाव येथे. आर्थिक दुर्बल घटकातील काही गरीब गरजू कुटुंबांना धान्य वाटप.निराधार कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी म्हणून थोडेसे सहकार्य मधुकर सोनाजी बर्फे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय पागरा रोड चितेगाव या ठिकाणी साखर ,रवा,मैदा.,तेल,तांदूळ,डाळ, मिठाई सह जीवन आवश्यक फरार वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था थोडेसे गरीबांसाठी पण एक हात मदतीचा. निराधारांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने सामाजिक कार्य करत असून जनहितार्थ वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. कसलेही राजकारण न करता निस्वार्थ पने समाज कार्यातून गरीबांना वेळ प्रसंगी मदत करताना दिसून येतात छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारांची प्रेरणा घेऊन निराधार गरजू समाजासाठी माणुसकीचा हात. थोडेसे सहकार्य म्हणून त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे. वंचित घटकातील समाजास जिवन आवश्यक वस्तूंची गरज भासल्यास गरजूंना प्रभाव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सहकार्य करेल असे सामाजिक कार्यकर्ते तथा संस्था अध्यक्ष मधुकर बर्फे यांनी जाहीर केले आहे