मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : मांजरखेड कसबा येथील संत गाडगे बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. सुधीर तायडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त शाळा व क. म. वि. च्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मातृ संस्थेचे सचिव प्रा. बी. आय. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.कार्यक्रमास प्राचार्य यू आर ढगे, सामाजिक कार्यकर्ता राजूभाऊ तेलमोरे,माजी मुख्याध्यापक जी. जी. मारबदे, पी. एन. देशमुख, फुबगांव येथील मुख्याध्यापक पी. बी. भोयर, मांजरखेड येथील सरपंच पल्लवीताई देशमुख, बासलापूर सरपंच सुरेंद्र पवार, उपसरपंच मोना खडसे विचार मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी प्रा सुधीर तायडे यांचा संस्था, विद्यालय व क. म. वि. कडून सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ व भेट वस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य उमेंद्र ढगे,प्रा. अजय शिरपूरकर, प्रा केशव डोंगरे, प्रा. संजय धोटे, प्रा. प्रवीण राऊत यांनी प्रा सुधीर तायडे यांचे बद्दल सेवा काळातील अनेक आठवणीना उजाळा दिला व पुढील आयुष्य निरोगी निरामय जावे यासाठी शुभेच्छा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सरदार सर, संचालन हेमंत यावले सर तर आभार प्रदर्शन अविनाश बोरकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा तन्वीर पठाण, प्रा निलेश मडघे, प्रा राजेश्वर मनवर, प्रा. केशव डोंगरे, संजय धोटे, प्रा प्रवीण राऊत, प्रा. वर्षा इंगळे, प्रा. शुभांगी डोंगरे, प्रा गायत्री भेंडे सर्व शिक्षक अविनाश बोरकर, दिनकर पवार, जगदीश माळोदे, विजय कदम, सचिन सूर्यवंशी, कु. इंगळे मॅडम, साधनाताई इंगळे, हेमंत यावले, समीर देशमुख यासह शिक्षकेत्तर कर्मचारी लिपिक अरुण मोहोड, प्रसेनजीत दामले, रावसाहेब वानखडे, वसंत नेवारे, प्रफुल्ल कोराटे, अक्षय पळसपगार आदींनी अथक परिश्रम घेतले.