बापू मुळीक
तालुका प्रतिनिधी पुरंदर
सासवड : पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य पदी झेंडेवाडी तालुका पुरंदर येथील अभ्यासू व समाजसेवी व्यक्तिमत्व अविनाश रामचंद्र झेंडे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष निलेश जगताप यांनी अविनाश झेंडे यांना दिले. माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादा जाधवराव व पुरंदर हवेली भाजपा विधानसभा मतदारसंघाचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कार्यरत राहून भाजपाची ध्येय ,धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून दिवे, झेंडेवाडी परिसरात शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे आणणार असल्याचे निवडीनंतर अविनाश झेंडे यांनी सांगितले.