प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी विद्यापीठ, दि. ३० ऑक्टोबर २०२३: हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापना करिता महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यान्वित असलेले डॉ. आनंद सोळंके हे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापना विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यासाठी ड्रोन, रोबोट, आयओटी, कृत्रिम बुद्धिमता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सिंग आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी थायलंड येथे परदेश दौऱ्यास रवाना झाले.
कास्ट प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी डॉ. आनंद सोळंके एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक, थायलंड येथे रवाना झाले आहे. प्रशिक्षण दि. १ ते १५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग सध्या शेतीसमोर असलेल्या सर्वात मोठ्या हवामान बदलांच्या आवाहनाला सामोरे जाण्यासाठी रचनात्मक संशोधन व शिक्षण पद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगितले. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. अतुल अत्रे व डॉ. सुनील कदम यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले.









