अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
दि.1 डिसेंबर केज तालुक्यातील नांदुर घाट ग्रामपंचायतला दिव्यांगाच्या हक्काचा 5% टक्के निधी सन 2022 ते 2023 या आर्थीकवर्षाचा निधी वाटप संदर्भात ग्राम पंचायतला निवेदन देण्यात आले.ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच युवराज(बापू) जाधव, ग्रामपंचायतचे उपसरपंच जगदीश आंधळकर, ग्रामपंचायत सदस्य रगु (अण्णा) जाधव यांना निवेदन देण्यात आले. शासन दिव्यांगाच्या हितासाठी विविध योजना राबवत आहे परंतु बर्याच योजना दिव्यांगापर्यंत पोहचत नाहीत अणि जर का माहीती झाली तर त्याला डोळे झाक केली जाते .कागदोपत्री घोडे नाचवले जातात त्या ठिकाणी दिव्यांग लोकांची हेळसांड होते.खरोखर शासनाने या बाबीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.नांदुरघाट सर्कल प्रहार संघटनेचे आध्यक्ष श्री .विशाल नाळपे,उपाध्यक्ष श्री.दत्ता आंधळकर ,व दत्ता देशमाने सह सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.
यावेळी ग्रामपंचायत नवनिर्वाचीत सरपंच युवराज बापु जाधव ,उपसरपंच जगदीश आंधळकर,ग्रामपंचायत सदस्य रघु आण्णा जाधव यांनी तुमचा निधी तुम्हाला लवकरात लवकर वाटप करू असे आश्वासन दिले.








