संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर -लाखो तरुण आणि समाज बांधवांच्या मनावरती राज्य करणारे तरुण तड़फदार नेतृत्व,सिने अभिनेते,कायदे तज्ञ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट महेश दादा देवकाते पाटील यांचा वाढदिवस अगदी जल्लोषात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.आपल्या नेत्याचा 44 वा जन्मदिवस कार्यकर्ते आणि पत्री सरकार ग्रुप मित्र परिवार यांनी त्यांना 1000 किलो च्या फुलांचा पुष्पहार घालून प्रेम व्यक्त करुन करण्यात आला.ॲडव्होकेट महेश दादा देवकाते हे एक ग्रामीण भागातील उमदं तरुण तड़फदार नेतृत्व.सदैव आपला मित्र परिवार नातेवाईक समाज बांधव आणि लोकांच्या सुखदुःखात मदतीला धावून जाण्यासाठी अग्रेसर.कधीही कोणी हाक द्यावी आणि महेश दादांनी तिकडे जाऊ नये असे क्वचितच घडत असेल.अस हे सर्वांना हवहवसं वाटणारं लोभस व्यक्तिमत्व.सदैव आपल्या हिमतीच्या जोरावर राजेशाही थाटात वावरणारा हा राजा अगदी लहानपणापासूनच सर्वांचा लाडका होता.पहिल्यापासूनच समाजकार्य,अभिनय,व्यवसाय आणि राजकारण यांची आवड असल्याने त्याच प्रकारचे लोक जोडले गेले आणि उभ राहीला दादांचा अनोखा मित्र परिवार.आणि यालाच मुर्त रूप देण्यासाठी यातूनच निर्माण झाला पत्री सरकार परिवार.आज महेश दादा या ग्रुप च्या माध्यमातून इंदापूर,बारामती,पुणे नव्हे तर अखंड महाराष्ट्रभर आपल्या चाहत्याचा वर्ग निर्माण करुन खूप मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करण्याच काम करत आहेत. अनेक तरुण यांना व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार देण्याचे काम ही महेश दादांनी केले आहे.आणि अशा आपल्या लाडक्या दादाचा वाढदिवस ही सर्वांना एक पर्वणीच असते. आणि यावेळी ही तसेच घडले.प्रसंगी सर्व समाजातून राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चित्रपट सृष्टी अशा विविध क्षेत्रातून मान्यवर मित्र परिवार आणि चाहते आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे,दौंड चे माजी आमदार रमेश आप्पा थोरात टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, भिगवन पोलीस स्टेशनचे दिलीप पवार,फैंड्री चित्रपट,चांडाळ चौकडीच्या करामती वेब सीरीज यातील विविध आणि सिने सृष्टीतील अनेक नामांकित कलाकार,दिग्दर्शक,निर्माते यावेळी आवर्जुन उपस्थित होते. तसेच महेश दादांना शुभेच्छा देण्यासाठी विधि व न्याय विभागातील अनेक मान्यवर, तरुण लोकप्रिय युवा किर्तनकार अर्चनाताई साळुंखे उपस्थित होत्या.यावेळी बहुचर्चित मराठी चित्रपट स्वराज्य संविधान*च्या पोस्टरचे प्रकाशन ही महेश दादा यांच्या हस्ते करण्यात आले.या मंगल प्रसंगी जेष्ठ न्याय व विधीतज्ञ ॲडव्होकेट सर, सचिन बोगावत,संजय रायसोनी, सचिन रणपिसे सर आणि किर्तनकार अर्चनाताई साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या शुभमंगल सोहळ्याचे सूत्र संचालन सचिन खडके यांनी केले आणि आभार स्वतः महेश देवकाते यांनी व्यक्त केले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेची संपूर्ण धुरा किरण वाघमोडे,अमोल देवकाते,शहाजी टिकोरे,गणेश जमदाडे,हसन शेख, विक्रम देवकाते,अनिल पवार,राहुल कदम या मित्र परिवाराने अगदी खंबीरपणे सांभाळली. प्रसंगी खूप मोठ्या प्रमाणात मित्र परिवार आणि जण समुदाय या अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य अनुभवत होता. यावेळी स्वाभिमान बंगला या ठिकाणी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.