जय वारकरी
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
करंजी येथील काकड आरती बारा अभंग समाप्ती निमित्य महाप्रसाद व पालखी सोहळ्याचे आयोजन गावाकऱ्याच्या व जागृतहनुमान देवस्थान कमेटी च्या वतीने करण्यात आले होते. हा पालखी सोहळा हनुमान मंदिर मार्ग निघून संपूर्ण गावातील भ्रमण करीत टाळ मृदंग च्या तालावर बालगोपालासहित गावातील व परगावातील महिला भजन मंडळी व भाविकांनि सहभाग घेतला व हरीनामच्या गजरात करंजी दुमदूमली या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्याकरिता हनुमान मंदिर च्या वतीने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते आणि गावातून पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात विशेष म्हणजे बालगोपालांनी अनेक प्रकारच्या वेशभूषा परिधान करून टाळ मृदंग च्या तालावर ठेका धरला. प्रत्येक घरा पुढे रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले आणि जागो जागी पालखीतल्या भाविका करिता पाणी बॉटल चाय नाश्त्याचा बंदोबस्त काही भाविकाकडून करण्यात आला होता या भक्ती मय सोहळ्यास सहभागी होण्याकरिता परिसरातल्या प्रत्येक गावातील भाविकांनी उपस्तित दर्शिविली आणि संपूर्ण करंजीमध्ये भक्ती मय वातावरण निर्माण झालेआणि श्री गजरात दिंडी गावात फिरून हनुमान देवस्थान मध्ये येऊन दहीहंडी व महाप्रसाद चा लाभ भाविकांनी घेतला. व आदिशय भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.


