मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेले गाव असलेल्या शेवगाव शहरात गेल्या काही वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे शहराला दिवसाआड पाणी मिळावे व शहरासाठी नव्याने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली त्याचा लवकरात लवकर शुभारंभ व्हावा , नगरपरिषदेने हे काम छत्रपती संभाजी नगरच्या एका नामांकित संस्थेस सुमारे पाच महिन्यापूर्वी दिले आहेत मात्र सदरच्या संस्थेने अजूनही हे काम सुरू केलेले नाही त्या कामास गती देण्यात यावी तसेच गेल्या अनेक वर्षापासून शहरात कधी बारा दिवसाने तर कधी पंधरा दिवसाने पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना विशेषता महिलांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे सध्याची पाण्याची पाईप लाईन अतिशय जीर्ण झाली असल्याने अनेकदा गटारीचे पाणी पाईप लाईन मध्ये उतरून हे गढूळ पाणी पिण्यासाठीयेत असल्याने डेंगू व इतर साथीच्या आजाराचा वाढता धोका दूर व्हावा यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावरून योग्य ती सुधारणा व्हावी शहरात दिवसा आड पाणीपुरवठा व्हावा व शेवगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बाबत दिलासा मिळावां या आशयाचे निवेदन शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील महिलांनी येथील नगरपरिषद सह सर्व संबंधितांना मंगळवारी दिले याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय झाला नाही तर येत्या 4 डिसेंबर रोजी शहरातील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर जाऊन महिलांच्या वतीने निषेध आंदोलन पुकारण्याचा निर्धार या निवेदनाद्वारे सर्व संबंधितांना देण्यात आला आहे स्नेहल फुंदे, सीमा बोरुडे, जयश्री काथवटे, शोभा शिनगारे , बालिका फुंदे, स्वीटी शिनगारे,मीना काथवटे सविता धनवट, मोना शिनगारे, आदींसह महिलांची उपस्थिती होती सोबत


