बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधि हिंगोली
हिंगोली: हवामान विभागाने सांगीतलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा व ढगफुटीचा मोठा तडाखा बसल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव , वरुड चक्रपाण , गोरेगाव मंडळात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. हिंगोली तालुक्यातील दि 27 पहाटेपासून विजांचा कडकडाट , वादळी वाऱ्यासह ढगफुटी होऊन मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. अवकाळी पावसामुळे नाले , ओढे तुडूंब भरून वाहत होते, तर अनेक भागातलील विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला होता. अवकाळी पावसाने नर्सी नामदेव मंडळमधील सवड , केसापूर , गिलोरी, हनवतखेडा ब्रम्हपुरी, वैजापुर, काळकोंडी , उमरा या गावात ढगफुटी अवकाळी पावसामुळे गहू , हरभरा, तुर, कापुस फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पांढर सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. या मंडळामध्ये मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचनामा व पाहणीसाठी फिरकले सुद्धा नाहीत तर त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्यांनी फोन लावले असता त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होते. याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. तसेच या गावापासून 10 किमी वर सोमवारी मुक्कामी आलेले युवा संघर्ष पद यात्रा काठणारे आमदार रोहीत पवार , आमदार रोहीत आर .आर पाटील हे मंगळवारी दुपारी 3 वाजता नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांचे दर्शनासाठी आले असता ते शेतकर्यांच्या नुकसान झालेले पाहतील व याबद्दल शेतकर्यांना भेटून आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करतील अशी आशा शेतकर्याना होती, पण त्यानी शेतकर्यांच्या नुकसानी कडे पाठ फिरवली. या नर्सी नामदेव मंडळा मध्ये कर्तव्यदक्ष जिल्हा कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी शेतकर्याची मागणी आहे. हिंगोली जिल्हातील शेतकर्यांना शासनाकडून मदत मिळवुन देण्यासाठी हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाश थोरात कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक रमेश शिदे , माधव कोरडे, श्यामराव जगताप, उतम वाबळे, रवि डोरले, यांनी पाठपुरावा करून शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .


