मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि: 29 नोव्हेंबर 2023 आज परळी शहरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते विधीवत प्रारंभ झाला.यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली. जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ही विशेष मोहीम राज्यभर राबवली जात आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे ‘शासन आपल्या दारी’हा कार्यक्रम होणार असून आज जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी दौरा केला. या ठिकाणी उभारण्यात येणारा सभा मंडप स्टॉल लाभार्थी यांची सुविधा या सर्वाबद्दल सर्वंकष चौकशी केली. कामाचा वेग वाढवण्याचे आदेश संबंधितांना दिले. या पाहणी दौऱ्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे,तहसीलदार वेंकटेश मुंडे,कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी,नायब तहसीलदार बी.एल.रुपनर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.