जलील शेख
तालुका प्रतिनिधी, पाथरी
साईबाबा तीर्थ लक्षेत्र विकास आराखडास आज दुपारी साडेचार वाजता मुख्य सचिव मनोज सोनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली , मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ह्या कामामध्ये जातीने लक्ष घातले असून , त्याच्या मंजुरी साठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा कामास लावली आहे.म्हणून काल पालकमंत्री संजय बनसोडे यांची मंजुरी तर आज उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यात येवून त्यात आराखड्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे , या बैठकीस केवळ मंत्रालय स्तरीय उच स्तरीय अधिकारी व परभणी येथील स्थानिक अधिकारी यांची उपस्थिती होती. लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची बैठक आयोजित करण्या बाबत संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्री सचिवालयाने सूचित केले आहे,सदरील आरखडा मागील पाच वर्षांपासून राजकीय अनास्थे मुळे प्रलंबित असल्याने तो रद्द होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु शिवसेनेच्या अल्पसंख्यक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना संत श्री साई बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या विकास आराखद्याचे महत्व लक्षात आणून देत व साईभक्त तसेच पाथरी वासियांची भावना लक्षात घेऊन आराखड्याच्या मंजुरीसाठी लक्ष वेधले होते , छत्रपती संभाजी नगर येथील बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून घोषणा करून घेण्यास यश मिळविले , तसेच पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडे पाठपुरावा केला, त्यामुळे काल पालकमंत्री तर आज मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे मंजुरीची प्रतीक्षा पार पडली आहे , लवकरच शिखर समितीची बैठक पार पडून तसा शासन निर्णय काढून घेण्यासाठी यापुढेही कायम मुख्यमंत्री साहेब यांचे कडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.