भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:तालुक्यातील वडूले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. रेणूका विष्णू आव्हाड यांची एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.यु.कुलकर्णी यांनी काम पाहिले.त्यांना ग्रामसेवक पी. एस.भगत यांनी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सौ.रेणुका विष्णू आव्हाड यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड घोषित केली.वडुले खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच सौ मीराबाई भाऊसाहेब आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती.याप्रसंगी तात्याबा पाटीलबा तुतारे,रेणुका विष्णू आव्हाड, दादासाहेब भानुदास गाडेकर,ललिता महादेव आव्हाड,रावसाहेब वसंत पाखरे,रंजना सोपान रनमले, रामदास मारुती पांढरे,अर्चना आजिनाथ आव्हाड,त्रिवेणी कानिफनाथ आव्हाड उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी कानिफनाथ आव्हाड,बापूसाहेब तुतारे,सचिन काळपुंड तसेच अनेक युवक मित्र व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.सरपंच सौ मीराबाई भाऊसाहेब आव्हाड व उपसरपंच सौ रेणुका विष्णू आव्हाड तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.