संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-
शासनकर्त्यांकडून आनंदाची किट ९०% लाभार्थ्यांना वाटप करुन १०% गरीबांना किट वाटप न करता गोरगरिबांची दिवाळी गोड केल्याचा वाजा,गाजा शासन करीत आहे. तर दुसरीकडे मागील दोन महिन्यांपासून अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना साखर वितरण होत नसल्याने पात्र लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.राज्यात सत्तारुढ असलेल्या शिंदे – फडणविस – पवार यांच्या युती सरकारकडून वर्षभरातील प्रमुख सणोत्सवाला अत्यल्प दरात आनंदाचा शिधा
वाटपचा स्त्युत्य असा उपक्रम हाती घेतला. त्यामुळे वर्षभर अन्नधान्यासाठी स्वस्त धान्य दुकानाचे उंबरठे झिजविणाऱ्या ग्राहकांना सणोत्सवात वेळेवर शिधा किट उपलब्ध होत असल्याचे समाधान मिळत आहे.अन्तोदय योजनेच्या लाभार्थ्यांना घाटंजी तालुक्यातील
अनेक शिधापत्रिकांना गत दोन महिन्यांपासून साखर वितरीत केल्या जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे अंतोदय शिधा धारकांमधून अजून संताप व्यक्त होत आहे. घाटंजी तालुक्यात व शहरातील रास्त धान्य दुकानदारांना अंत्योदय शिधापत्रिकाधारक याबाबत वेळोवेळी विचारणा करीत आहेत. मात्र शासनाने मागील दोन महिन्यापासून संबंधित साखरेबाबत उदासीन धोरण अवलंबिले आहे. दरम्यान, रास्त धान्य दुकानदारांनी
साखरेसाठी लागणारे शुल्काचा भरणा केलेला आहे. तरीही प्रति कार्ड धारक वीस रुपये किलो दराने एक किलो साखर दरमहा अंतोदय शीधा धारकांना दिले जाणारी साखरेचे वितरण बंद पडले आहे. ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये शिधाधारकांना साखर मिळालीच नसल्याने शासनाने साखरेचा पुरवठा बंद केला की काय ? असा प्रश्न अन्तोदय लाभार्थी करित असून लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.







