पवन मनवर
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : इंदिरा स्मुती चषक समारोह समिती,इंदिराजीव अखंड ज्योती पारमार्थिक ट्रस्ट व ओम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्ताने 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर ओम कॉलनी यवतमाळ येथे इंदिरा स्मृती चषक महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या भजन स्पर्धेच्या कार्यक’माचे उद्घाटक म्हणून मधुकर खोडे महाराज आणि अध्यक्ष म्हणून महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे उपस्थित होत्या.या युगात कोणीच कोणाला श्रेष्ठ व ज्येष्ठ मानायला तयार नाही. आशा वेळी कोणाच्या चांगल्या कामाला केवळ चांगलं बोलण्यासाठी त्यातही गौरव करण्यासाठी मोठं मन, भक्कम सामर्थ्य व धैर्य लागते, असे मत उपस्थित व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे यांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना खोडे महाराज म्हणाले, सर्वांगसुंदर जीवन जगण्याची कला अध्यात्मातून निर्मित होते. व्यसनमुक्तीपासून सुरुवात करून आयुष्यात विजयी होण्याची कला भजनाच्या शक्तीत आहे. भजनातून महिलांच्या बुद्धीमत्तेत प्रसन्नता निर्माण होऊन मानसिक तणावातून दूर होण्यासाठी मदत होते, असेही ते म्हणाले. संध्या सव्वालाखे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, महिलांवरील अन्यायकारक प्रथा बंद झाल्या पाहिजेत. ज्यामुळे महिला मानसिक विवंचनेत जाईल, भारतीय संस्कृती जपण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. महिलांचे सामाजिक स्थान हे श्रेष्ठ असून त्या कोणत्याही संघर्ष करताना खचून जात नाहीत.या कार्यक’माचे प्रास्तविक अरुण राऊत यांनी केले. तर आभार सुरेश चिंचोळकर यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक’मात सर्वप्रथम हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्या देशमुख, मनीष पाटील, नाना गाडबैले, सूर्यप्रकाश जैस्वाल, पुष्पा नागपुरे, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, भारत राठोड, राजीव निलावार, प्रभाकर देशपांडे, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड, श्रीकांत देशमुख, घनश्याम दरणे, विलास देशपांडे, सतीश भोयर, अशोक कोंडेकर, स्वाती येंडे, नंदिनी दरणे, स्वाती दरणे, चंद्रशेखर चांदोरे, अजय शेटे, नाना गंडे, साहेब जुनघरे, प्रलय टिप्रमवार, तुषार देशमुख, मोरेश्वर पांढरकर, रामराव पवार, वासुदेव महल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


