शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलनात सहभागी महिला शिक्षकेचे बाळ रडत असल्याने सदर महिलेने शिक्षणाधिकारी कार्यालयातच झोका बांधून त्यात बाळाला झोपविले. मागील 10 वर्षांपासून वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून सोनपेठ तालुक्यातील श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यालय येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांनी कुटुंबासह बुधवारी (दि. 22) जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.विद्यालयातील शिक्षक के.टी. तोडकरी,ए.के.लोणे,जे.व्ही. कुलकर्णी,के.पी.जोगदंड,आर. आर. चौरे व पी.आर. बुच्छलवार या सहा शिक्षकांचे वेतन वारंवार अर्ज विनंती करून देखील मुजोर संस्थाचालक दहा वर्षापासून कार्यरत असताना देखील पगार देत नसल्याने कुटुंबाची उपासमार होत असल्याचेही या शिक्षकांनी वारंवार शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज विनंती करून देखील शिक्षण विभाग देखील संस्थाचालकाच्या हातचे बाहुले बनून त्याच्याच चुकीच्या आदेशाचे पालन करत होता तेव्हा सगळीकडे परेशान झालेल्या शिक्षकांनी शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे त्यांच्या पोटाची भाकरी त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक आणि त्यांच्या परिवारासहीत त्यामध्ये वृद्ध आई वडील आणि दोन दोन तीन महिन्याच्या बालकासह शिक्षण विभागांमध्ये शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेवटी शिक्षणाधिकारी श्री शिंदे साहेब यांनी सर्व शिक्षकांचे शालार्थ आयडीचे प्रस्ताव दाखल करून त्यांचा पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा होईपर्यंत शांत बसणार नाही असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे सर्व कर्मचारी त्यांच्या परिवारासह तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे , भास्करराव खटिंग,गजानन भाऊ तुरे, रामप्रसाद मामा गमे,रामभाऊ आवरगंड,सामाजिक कार्यकर्ते कादरी साहेब, बाळासाहेब घाटोळ,माऊली मामा शिंदे उद्धवराव जवंजाळ, आदी उपस्थित होते.