परवेज खान
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा:टीचर्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित पांढरकवडा पब्लिक स्कूल पांढरकवडा चा 14 वर्ष आतील शाळेचा वर्ग 7 वीचा विद्यार्थी वेदांत अजय निखार याने आपला उत्कृष्ट खेळ दाखवला. त्यामुळे त्याची दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी जालना येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणी खो – खो स्पर्धे करिता निवड झाली आहे.संस्थेचे सचिव मा. श्री आनंद वैद्य यांनी त्याचे कौतिक करून त्याला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. त्याला शाळेचे प्राचार्य श्री रितेश मुप्पिडवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.







