बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली
हिगोली : जिल्हा परिषदच्या इमारतीला बुधवारी (22) ला दुपारी एकच्या सुमारास शार्टसर्किटमुळे आग लागली. मात्र पालिकेच्या सतर्कने आगीवर अवघ्या एक तासासच नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील अभ्यागत कक्षातील साहित्य जळून खाक झालेले आहे. या घटनेने खळबळ उडाली होती . हिंगोली जिल्ह परिषदेमध्ये बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अधिकारी , कर्मचारी काम करीत असताना अचानक शार्टसकिटमुळे मोठा आवाज झाला. अन त्यांनंतर आग भडकली. यामध्ये अभ्यागत कक्षात लाकडी साहित असल्यामुळे आग अधिकच भडकत गेली. आग लागल्याचे लक्षात येताच अधिकारी , कर्मचारी लगेच कार्यालयाच्या बाहेर पडले. एक तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले , मात्र तो पर्यंत व्हिसी हॉल मधील साहित्य जळून खाक झाले होते. पालिकेच्या सतर्कतेमुळे या आगीची झळ इतर विभागांना बसली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीमध्ये किती रुपयांचे नुकसान झाले याचा अंदाज कळू शकला नाही. दरम्यान जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार , गणेश वाघ , आत्माराम बोंद्रे यानी नुकसानीची पाहणी केली. तर पोलीस निरिक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीला शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दैनिक अधिकारनामा शी बोलताना दिली.


