सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २४ नोव्हेंबर २०२३ बीड जिल्ह्यातील जनतेने मुंबई येथे दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या संविधान सन्मान महारॅलीचे सहभागी होण्याचे आवाहन बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी केले आहे. दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी देशभरात साजरा होणाऱ्या संविधान दिनानिमित्त संविधान बचाव आणि संविधान सन्मान महारॅलीचे आयोजन दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या देशाला समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद तथा लोकशाही या सर्वांना एकत्रित करून भारतीय संविधानाची निर्मिती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली म्हणून व दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या भारत देशाला अर्पण करून या देशात लोकशाहीची बीजं पेरली गेली म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो परंतु याच देशातील काही विकृत बुद्धीचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. देशात संविधान बदलण्यासाठी अनेक षडयंत्र रचले जात आहेत. अशा संघटनांच्या विरोधात देशातील बौद्धांनी आणि बहुजन समाजाने एल्गार पुकारला आहे. देशात आतापर्यंत संविधान विरोधी घडत आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा आद.ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून. या महारॅलीस प्रमुख मार्गदर्शन आद. ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर करणार असून या संविधान बचाव महारॅलीस बीड जिल्ह्यातील बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.


