प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२३ नोव्हेंबर
काल परवा दिनांक २१ नोव्हेंबर, वार मंगळवार रोजी रंगनाथरावजी सोळंके यांच्या सोनपेठ येथील जनसंवाद कार्यालय या ठिकाणी ,सोनपेठ मंडळातील बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पाथरी विधानसभा युवा वॉरियर्स यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून परभणी लोकसभा विस्तारक श्री प्रमोदजी कराड साहेब, पाथरी विधानसभा, सोनपेठ मंडळ अल्पकालीन विस्तारक श्री युवराजजी बचाटे यांच्यासह मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आढावा बैठकीसाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. येणाऱ्या काळातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मेरा बुथ सबसे मजबूत* या अभियान अंतर्गत बुथ बांधण्याची रचना करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सोनपेठ मंडळातील, प्रत्येक बूथ वरून आपल्या पक्षाला 51 टक्क्यापेक्षा जास्त मतदान कसे मिळविता येईल, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच चर्चा देखील करण्यात आली.
या बैठकीला सोनपेठ मंडळातील माजी मंडळ अध्यक्ष महादेव गिरे पाटील , हनुमानजी सावंत, माजी सभापती अशोकरावजी रासवे, गणेशराव हांडे, विजयराव काळे,चव्हाण ताई, जिल्हा निमंत्रित सदस्य मल्लिकार्जुन सौंदळे सर, मंडळ अध्यक्ष श्रीराम राठोड, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष परमेश्वरजी गवाडे पाटील, शहराध्यक्ष संतोष दलाल,ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्ष प्रल्हादजी आढाव, किसान मोर्चा मंडळ अध्यक्ष भगवानजी चव्हाण , कामगार आघाडी मंडळ अध्यक्ष शिवरामजी रोडे, मंडळ उपाध्यक्ष परमेश्वर जी यादव, मंडळ सरचिटणीस आप्पासाहेब मुलगीर, शक्ती केंद्रप्रमुख व पाथरी विधानसभा युवा वॉरियर्स उपस्थित होते.
‘ सब का साथ, सब का विकास ‘
मोदीजींनी दाखवलेल्या या प्रगती मार्गावर चालून हे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा सर्वांनी मनोमन संकल्प केल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत परभणी जिल्हा 100% भाजपमय होणार, हा विश्वास दृढ झाला आहे. अशी माहिती रेणुकादास वसंतराव देशमुख पक्ष विस्तारक, पाथरी विधानसभा मतदारसंघ यांनी दिली .