मनोज गवई
तालुका प्रतिनिधी, चांदुर रेल्वे
चांदूर रेल्वे :समर्थ बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित ट्रायडेंट इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयात बी.एस.सी.नर्सिंग (चार वर्ष) व जी.एन.एम.(तीन वर्ष) पाठ्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. संस्थाध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणि रोजगाराभिमुख पाठ्यक्रमाचं महत्व व अनिवार्यता याविषयी अवगत केले. प्रियंका विश्वकर्मा बोलतांना पुढे म्हणाल्या की, कुऱ्हा रोडवर प्रशस्त जागी महाविद्यालय उभारण्यात आले असून बी.एस.सी.नर्सिंग ला महाराष्ट्र यूनिव्हर्सिटीऑफ हेल्थ सायन्सची मान्यता व जी.एन.एम.कोर्सला महाराष्ट्र बोर्ड आफ परामेडिकल सायन्सची मान्यता मिळाली आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम युवक व युवतीस नोकरीसाठी वरदान ठरणार आहेत. महाविद्यालयात प्रशस्त प्रयोगशाळा, आधुनिक लायब्ररी व डीजीटल संसाधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ऊच्च विद्याविभूषित प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहेत. दोन्ही अभ्यासक्रमात प्रॅक्टीकल महत्वाचे असल्याने स्थानिक ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अनेक वर्षापासून पाहीलेले स्वप्न साकार एम. एस.सी.मॅथ्स मध्ये गोल्ड मेडल प्राप्त व एम.पी.पी.एस.सी.उत्तीर्ण प्रियंका विश्वकर्मा म्हणाल्या की परंपरागत अभ्यासक्रमाची पदवी घेऊन विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वणवण भटकंती करावी लागते. बेरोजगारीवर विजय मिळविण्यासाठी हा रोजगार पुरक अभ्यासक्रम आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. ही मनात रोजगार गेल्याची खंत होती.त्यामुळे युवकांना हमखास रोजगार मिळू शकेल याची हमी घेत हे स्वप्न ट्रायडेंट इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग च्या माध्यमातून पुर्ण होत आहे. स्थानिक कुऱ्हा रोडवर महाविद्यालय मध्यवर्ती असल्याने विद्यार्थ्यांना सोयीचे आहे. चांदूर रेल्वे तालुक्या शिवाय धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, आर्वी, पुलगाव,बाभुळगाव, नेर तालुक्यातील विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.सर्व सुविधा यूक्त होस्टेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9422117575 व 9090232728 या नंबरवर संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी केले आहे.