वसंता पोटफोडे,
शहर प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव शहरात क्रांतिकारी शहीद भगतसिंग संघटनेची स्थापना करण्यात आली संघटनेचा उद्देश तालुक्यात व शहरात सामाजिक बांधिलकी सामाजिक सेवा व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यानिमित्त शहीद भगतसिंग संघटनेचे अध्यक्ष श्री निलेश हजारे यांनी भगतसिंग यांचे कार्य लक्षात घेऊन सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचाराबद्दल मार्गदर्शन करून संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली क्रांतिकारी शहीद भगतसिंग संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री निलेश हजारे उपाध्यक्ष मंगेश पिंपरे रोहित पिंपरे तर सचिव स्वप्निल हजारे उपसचिव ऍड दिक्षांत खैरे प्रदुमन इंगोले व उप कोषाध्यक्ष सुरज गुजरकर प्रसिद्धी प्रमुख सागर एंबडवार , संदेश धानोरकर, संपर्कप्रमुख सागर वर्मा , अनिकेत वनस्कर सोशल मीडिया प्रमुख सौरव नारनवरे , शुभम ठाकरे व सदस्य म्हणून अजय चांदेकर, अंकित घोडे, गणेश सावसाकडे नयन पेंदोर हर्ष येडे यांची नियुक्ती करण्यात आली संघटनेचे इतर सदस्य प्रशांत काटकर सिद्धार्थ मानवटकर राहुल ला कसवार व आर्यन लोंढे सह असंख्य सदस्य उपस्थित होते.