संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर : प्रतिनिधी दि.23/11/23 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी सौं.अमृता फडणवीस यांचे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे गुरुवारी (दि.23) स्वागत केले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले.येथे येऊन बराच कालावधी लोटल्याने श्री नृसिंहाची दर्शनासाठी येण्याची ओढ होती.आज श्री विठ्ठलाची व श्री लक्ष्मी-नृसिंहाची पूजा केली आहे,हा मोठा योग आहे.श्री नृसिंह भगवान सर्वज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काहीही मागावे लागत नाही,मनात असेल ते सगळे मिळते,असे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नमूद केले.


