अंकुश जागले
तालुका प्रतिनिधी, शहापुर
शहापूर:-पहाटेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने भाजीपाला तसेच बॉयलर कोंबड्या भरलेल्या पिक- अप, टेंपो, मुंबई,ठाणे, वाशी,कल्याण,सारख्या मोठ्या शहरांमध्ये पुरवठा करतात. मात्र, सदर माल मार्केट मध्ये खाली केल्या नंतर तेथील कचरा म्हणजेच, सडलेला भाजी-पाला, भाजीपाल्याचा टाकाऊ भाग, मृत पावलेल्या कोंबड्या, त्यांचा टाकाऊ भाग, प्लास्टिक पिशव्या, इ. घान ही महामार्गा लगत आणुन टाकली जाते.त्याचप्रमाणे महामार्गालगत असलेल्या छोट्या-मोठ्या बाजार पेठेतील कचरा देखील येथेच टाकून जाळला जातो. या मुळे हवा प्रदूषित होऊन त्याचा त्रास आपल्या बरोबर इतरांना ही होतो हे कचरा टाकणार्यांच्या लक्षात ये नाही. त्यांना असे वाटते, की आम्ही घान कचरा शहरात न टाकता उलट शहरातला कचरा शहरा बाहेर नेऊन टाकतो. म्हणजे च आम्ही शहर स्वच्छ ठेवण्यास एक प्रकारे मदतच करतो अशा अविर्भावात दिसतात त्यामुळे कोणत्याही प्रकारची भिती, कींवा संकोच वाटत नाही.परंतु याचे दुष्परिणाम येथील आजुबाजूच्या गाव- खेड्यातील लोकांना तसेच,
रस्त्याने जाणाऱ्या- येणाऱ्या प्रत्येकालाच होत आहे.या कचऱ्यामुळे येथील पर्यावरण दुषित होऊन आजाराला आमंत्रण दिले जात आहे.हे लक्षात घेऊन, यावर योग्य ते पाऊल उचलुन, वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कचरा समस्या देखील त्याच गतीने वाढत आहे.त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास याचे दुष्परिणाम भविष्यात सर्वांनाच भोगावे लागतील.







