अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 22 नोव्हेंबर :- यवतमाळ जिल्ह्यात या वर्षी मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली असून त्यात घाटंजी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. मध्यंतरी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यात यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुका हा पूर्णपणे वगळला असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रविवारी आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी घाटंजी येथे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषी अधिकारी राठोड व शेतकरी यांच्या उपस्थितीत घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त भागातून वगळल्या बाबत तातडीची आढावा बैठक घाटंजी येथील विश्राम गृहावर आयोजित करण्यात आली. घाटंजी तालुक्याची आणेवारी 45 टक्के पेक्षा कमी आहे. याबाबत तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या हस्ते तात्काळ सर्वेक्षण करून त्या संबंधीचा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी तहसीलदार विजय साळवे व तालुका कृषी अधिकारी राठोड यांना दिल्या. यावेळी घाटंजी तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश डहाके, भाजपाचे घाटंजी शहराध्यक्ष तथा घाटंजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष राम खांडरे, घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते मोरेश्वर वातिले, भाजपा तालुका सरचिटणीस नंदकिशोर डंभारे, आमदाराचे स्विय्य सहाय्यक दिलीप पवार, संदिप माटे, अमीत महल्ले, अडते भरत पोतराजे, नाना मस्के, पंकज ठाकरे, विलास महल्ले, उत्तम राठोड तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.