गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:-नांदुरा तालुक्यातील सर्वात मोठी असलेली भारतीय स्टेट बँकेत दुपारी एक वाजता एका वृद्धाच्या पिशवीतील चाळीस हजार रुपये दोन अज्ञात महिलांनी लंपास केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दिवस ढवळ्या घडली आहे. सविस्तर असे की नांदुरा येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी असलेले श्रेयस आगरकर यांचे वडील दामोदर आगरकर हे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता भारतीय स्टेट बँक शाखा नांदुरा येथे पैसे काढण्यासाठी गेले होते त्यांनी पैसे काढण्याच्या लाईन मध्ये उभे राहून बँकेतून चाळीस हजार रुपये काढले व काढलेली रक्कम आपल्याजवळील पिशवीमध्ये ठेवून घेतली ते ठेवत असताना त्या ठिकाणी असलेल्या दोन अज्ञात महिला यांनी पाहून घेतली काही वेळानंतर पिशवीतील चाळीस हजार अलगदपणे काढून घेतले. नंतर त्या दोन महिला तिथून गायब झाल्या ही घटना झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्या वृद्धाच्या लक्षात आल्यानंतर. ते आपल्या मुलाला बँक व्यवस्थापककडे घेऊन गेले व घडलेली सर्व घटना सांगितली असता. बँक व्यवस्थापकाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. दोन अज्ञात महिला त्यांच्या हातातील पिशवीतून चाळीस हजार रुपये काढत असल्याचे आढळून आले. ताबडतोब याबाबतची तक्रार दामोदर आगरकर यांचा मुलगा श्रेयस आगरकर यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यावरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात दोन महिला विरुद्ध कलम ३७९.३४. भादवी कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमलदार जवंजाळ साहेब करीत आहे. आता दामोदर आगरकर यांना त्यांच्या पिशवीतून चाळीस हजार लंपास केलेल्या त्या दोन अज्ञात महिलांचा नांदुरा पोलीस किती दिवसात शोध लावतात असे आव्हान नांदुरा पोलिसांसमोर उभे ठाटले आहे. हे आता येणाऱ्या काळातच समजेल. या घटनेमुळे नांदुरा तालुक्यातील बँक खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक खातेदारांनी दैनिक अधिकार नामा प्रतिनिधी नांदुरा यांच्याजवळ प्रतिक्रिया दिल्या आहेत.







