मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
पाथर्डी- दि. २२ नोव्हेंबर – शेवगाव पाथर्डी तालुका व कोरडगाव सर्कल दुष्काळ सदृश्य जाहीर करावा यासाठी मागणीसाठी जिल्हाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा,अ.नगर गोकुळ दौंड हे आज बुधवार दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. शेवगाव पाथर्डी हे दोन्ही तालुके संपुर्ण गंभीर दुष्काळी तालुके असून त्यांचा समावेश हा गंभीर दुष्काळी यादीत व्हावा.माझ्या मायबाप जनतेसाठी व गोरगरीब शेतकऱ्यांसाठी माझं हे उपोषण चालू झालेल आहे. कुठलाही स्वार्थ नसतानाही कुठलाही पक्ष नसताना मी या उपोषणासाठी बसलो आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपोषणामध्ये सहभागी व्हा. तिसगावसह पाथर्डी पुर्व भागातील अकोला,कोरडगाव आणि खरवंडी ही मंडळे या यादीतून वगळले आहेत. ही सर्वच मंडळे चालू वर्षी पावसाला मुकली असून शासनाच्या सदोष सर्वेक्षण पध्दतीच्या चुकीच्या नोंदींमुळे दुष्काळी यादीतून हुकलेल्या मंडळांवर खूप अन्याय होत आहे.हे दोन्ही तालुके संपुर्ण गंभीर दुष्काळी तालुके असून त्यांचा समावेश हा गंभीर दुष्काळी यादीत व्हावा.मध्यम,दुष्काळसदृश असा निकष न लावता संपुर्ण पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)