फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
आळे ता:-जुन्नर येथील तितरमळ्यात एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे अशी माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. आळेच्या तितरमळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याने धुमाकूळ घातला होता.स्थानिक शेतकरी व नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी केली होती त्यानुसार वनविभागाने येथे पिंजरा लावला असता या पिंजऱ्यात दोन वर्ष वयाची बिबट मादी पकडण्यात आली.या बिबट मादीला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे काकडे यांनी सांगितले. वनविभागाचे उपवनसरंक्षक अमाल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम.काकडे, आळेचे वनपाल श्री साळुंके, वनरक्षक श्री भालेराव यांनी ही कारवाई केली.


