अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
महाराष्ट्रातील पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून प्रत्येक तालुका, गावा खेडे पाड्यात आजही आदिवासींची संस्कृती तारपा नाच मोठ्या उत्साहाने नाचताना मावशी,काकी, मामी तसेच काका, मामा दिसून येतात, तसेच आदिवासी संस्कृती टिकवलेली ही दिसून येते, या नाचामध्ये मुख्य म्हणजे नैसर्गिक साधना पासून बनवलेला ताडाची पाती, बांबूच्या दोन टोकऱ्या, मेन, दुधीचा सेवाला असा साधनांपासून बनवलेला तारपा या तारपाचे धुंदी वरती गावातील मामा,मामी, मावशी, मावशा,काका, काकी हातात हात घेऊन एक जोड्याने तारप्याच्या चे तालावरती नाचताना दिसून येतात, तारपा नाच हा फक्त पालघर पुरता किंवा महाराष्ट्र पुरता नसून तो जगप्रसिद्ध असा हा आमचा तारपा नाच आहे, या तारपानाचा ची गोडी देश विदेशातील नागरिकांना सुद्धा असल्याचे आपल्याला समजते, गावातील कोणताही सण उत्सव असो आपल्या निसर्ग देवाला प्रसन्न करण्यासाठी मुख्य म्हणजे तारपा वाद्याचा वापर केला जातो आणि आदिवासींच्या प्रत्येक सण उत्सवांमध्ये मुख्य वाद्य म्हणून तारपा हा वाद्य असतो आणि या तारपाच्या धुंदी वरती मोठ्या उत्साहाने गावातील सर्व गावकरी – पाडकरी एकत्र येत मोठ्या उत्साहाने तारपा नाच नाचताना आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे आपल्या पालघर जिल्ह्यातील गावाखेडे आणि तालुक्यांमध्ये तारपा नाच हा टिकलेला जपलेला आणि आदिवासींची खरी संस्कृती टिकवलेली दिसून येते,या नाचामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत या नाचाचा आनंद घेत असतात आणि आदिवासी समाजामध्ये जन्मला आलेला प्रत्येक नागरिक मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो तारपाच्या धुंदी वरती नाचल्याशिवाय थांबत नाही आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या प्रत्येक सण उत्सवामध्ये तारपा हा मुख्य वाद्य असल्याकारणामुळे प्रत्येक आदिवासी व्यक्तीला तारपा नाच हा नाचता येतच असतो आणि हा नाच एखाद्या ठिकाणी नाचताना बघितला तरी सुद्धा ज्या व्यक्तीला तारपांना नाचण्याची आवड असते त्या व्यक्तीच्या अंगात तरतरा येतो आणि तोही कुठेही जात असेल तरीसुद्धा तो तारप्याच्या धुंदी वरती नाचण्यासाठी थोडा वेळ तरी नक्की थांबणार आणि नाचाचा आनंद घेत असतो,तारपा म्हणजे फक्त वाद्य नसून आमचे दैवत आहे, तारपाचे धुंदीत एवढी शक्ती असते या धुंदी वरती निसर्ग देऊ सुद्धा प्रसन्न होऊन व्यक्तींच्या अंगामध्ये प्रत्यक्ष त्या नैसर्गिक सक्तीचा अनुभव करून देते आणि म्हणूनच तारपा फक्त आमचा वाद्य नसून तारपा हा आमचा दैवत आहे,तारपा आमचा दैवत आहे.