संजय भोसले.
तालुका प्रतिनिधी, कणकवली.
कणकवली तालुक्यातील अगदी टोकाला असलेल्या ,कोर्ले धालवली हायस्कूलचे मुख्याध्यापक रत्नाकर सरवणकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राज्य गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई 62 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन 2023 राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार 2023 सोहळा जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेज,फैजपूर, ता.यावल. जि.जळगांव याठिकाणी संपन्न झाला.या सोहळ्यात देवगड तालुक्यातील कोर्ले धालवली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रत्नाकर रामचंद्र सरवणकर यांना केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय व प्रशंसनीय कार्याच्या गौरवार्थ “राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रत्नाकर सरवणकर यांनी आपल्या विद्यालयात अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत.एक उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे.फैजापूर या तील जळगाव येथील अधिवेशनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक रत्नाकर सरवणकर यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ.ऋचा सरवणकर याही उपस्थित होत्या.या पुरस्काराबद्दल कोर्ले धालवली शिक्षण संस्थेचे संस्थापदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व हितचितका कडून अभिनंदन करण्यात आले .


