सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २१ नोव्हेंबर २०२३ मराठा आरक्षण आणि आरक्षणासाठी उभारण्यात आलेले आंदोलन शांततेत चालत असताना बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात अनेक आरोपी सापडले असून भविष्यात याप्रकरणी बीड पोलिस प्रशासनाच्या रडारवर किती आरोपी असतील याचा अंदाज बांधता येत नाही बीड जिल्ह्यात ज्या पध्दतीने शांतपणे चालू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आले. आणि ते कोणी दिले हे मात्र अद्याप उघड झालेले नाही. या हिंसक वळणातून जो हिंसाचार झाला तो मात्र जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गेल्या काही दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले सर्व आरोपी ताब्यात घेतले आहेत. परंतु आरोपींचा आकडा वाढतच जात असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पोलिस प्रशासन कारवाई करत असताना काही गांभीर्य पुर्ण माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील या हिंसाचारात आरोपींमध्ये शाळा महाविद्यालयात शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असून आतापर्यंत याप्रकरणी १७ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही माहिती समोर येताच जिल्ह्यातील पालकांची झोप उडाली असून आरोप सिद्ध झालेल्या अल्पवयीन मुलांचा भविष्य अंधारात चाचपडत असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणी बीड पोलिसांनी आत्तापर्यंत १९१ आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यात १७ आरोपी अल्पवयीन मुले आहेत. या घटनेतील आरोपींची संख्या ५०० जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.









