संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
राज्यात धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतो आहे धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी बारामती तसेच चौंडी येथे उपोषनाचे हत्यार उपसले आहे मागील वेळी सरकारने धनगर समाजाला लिखित आश्वासन दिले होते परंतु दिलेला शब्द पाळला नाही गेला नसल्यामुळे दौंड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षण अमलबजावणीसाठी दौंड चे तहसिलदार अरुण शेलार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी यळकोट यळकोट जय मल्हार कोण म्हणते देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी दौंड तालुक्यातील धनगर समाजातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.









