मनोज गवई
तालुका प्रतिनिधी, चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : सुयश बहुउद्देशीय संस्थेला दहा वर्ष पुर्ण झाले त्या अनु षंगाने दशक पूर्ती म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य व कामाला सलाम करुन त्यांना समर्पित दि.25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर असे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुमेद सरदार यांनी दिली. दि.25 नोव्हेंबर शनिवारला सकाळी 9 वाजता उद्घाटन होणार असून संस्थेच्या वतीने पोलीस चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे उपस्थित राहणार असून चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दिवसभर टेनीस बाॅल क्रिकेट सामने खेळवण्यात येतील. दि.26 नोव्हेंबर रविवारला सायं.6 वाजता संविधान सन्मान सभा व 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली व पुणे येथील प्रमुख वक्ते शेख सुभान अली यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माजी गृहमंत्री अनील देशमुख, माजी मंत्री तथा आमदार यशोमतीताई ठाकूर, माजी आमदार विरेन्द्र जगताप उपस्थित राहणार आहेत. दि.27 नोव्हेंबर सोमवारला सायं.6वाजता नृत्य स्पर्धा, लावणी स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. समारोपीय कार्यक्रमास पोलीस महानिरीक्षक मान. जयंत नाईकनवरे साहेब उपस्थित राहणार आहेत. हे सर्व कार्यक्रम जि.प.शाळेच्या आतील प्रांगणात होणार आहेत. या तीन दिवसीय महोत्सवाला चांदूर रेल्वे,धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन सुयश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमेद सरदार व पदाधिकारी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे पदाधिकारी सुमेद सरदार, हर्षल वाघ, देवानंद खुणे,शहजाद सौदागर व कार्यक्रम उत्सव समिती अध्यक्ष सागर दुर्योधन हे उपस्थित होते.









