बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
स्वामी चिंचोली ता. दौंड येथे मराठा योद्धा मनोजच्या जरांगे यांचा राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसाठी लावण्यात आलेला बॅनर काही समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या वेळी फाडला.तसेच काही दिवसापूर्वी येथे मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. ती पाटी देखील वाकविण्यात आली आहे.त्यामुळे . स्वामी चिंचोली येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दौंड चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना निवेदन देऊन आज्ञात ईसमां विरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले असून .कारवाई न झाल्यास 25 नोव्हेंबर रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती स्वामी चिंचोली पाटी येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.